मुंबई : बहुजननामाऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 107 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले आहेत. तर 16,035 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आजपर्यंत 75 लाख 73 हजार 069 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.89 टक्के झाले आहे. राज्यात आज 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1491061805858562048?s=20&t=wzzMJ4wVgYI2E4FHP_IiQA
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 57 लाख 68 हजार 634 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 78 लाख 16 हजार 243 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 96 हजार 069 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 6 लाख 39 हजार 490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2412 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 6107 new patients in the last 24 hours in the state, learn other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ELSS Funds | ‘हे’ 10 ELSS फंड देत आहेत धमाकेदार रिटर्न, प्रॉफिटसह टॅक्ससुद्धा वाचवा
Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 964 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune Crime | निलेश घायवळ टोळीतील एकाला मोक्का प्रकरणात अटक
Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील 12 जणांना जामीन मंजूर
Sangli Crime | गुप्तधन शोधले नाही म्हणून केला तरुणाचा खून; प्रचंड खळबळ