Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 964 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Update | 964 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्ण संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 964 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2075 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 5 हजार 048 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 964 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 53 हजार 256 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 31 हजार 997 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 11 हजार 950 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 200 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 42 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 30 रुग्ण आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 6.59 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title :- Pune Corona Update | 964 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1125 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | बाणेर-बालेवाडी येथे 700 कोटी रुपये खर्चून कॅन्सर हॉस्पीटल उभारणार ! पैसे नसल्याने महापालिका बांधा-वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर हे हॉस्पीटल उभारण्यास प्रयत्नशील

Pune Crime | निलेश घायवळ टोळीतील एकाला मोक्का प्रकरणात अटक

Rupali Chakankar | वाईन विक्रीचं धोरण आर्थिकदृष्ट्या योग्य, रुपाली चाकणकर यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे समर्थन

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील 12 जणांना जामीन मंजूर

Sangli Crime | गुप्तधन शोधले नाही म्हणून केला तरुणाचा खून; प्रचंड खळबळ

Multibagger Stocks | ‘या’ 5 शेयरने एक महिन्यात भरली गुंतवणुकदारांची झोळी, तुमच्याकडे सुद्धा असावेत ‘हे’ स्टॉक्स; जाणून घ्या

Sangli Crime | गुप्तधन शोधले नाही म्हणून केला तरुणाचा खून; प्रचंड खळबळ