बहुजननामा ऑनलाइन टीम शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे(Coronavirus) 328 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनामुळं शहरातील 18 जणांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील 5 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळं मृत्यू होणार्यांची संख्या 4 हजार 293 वर जाऊन पोहचली आहे. आज दिवसभरात 316 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 62 हजार 419 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 52 हजार 485 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 641 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 494 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 290 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.