नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमध्ये आज पुन्हा राजकीय नाट्य रंगले. मध्यप्रदेशच्या राजकारणातील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 15 महिन्यांचे सरकार चालवल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कमलनाथ म्हणाले, मला जनतेने पाच वर्षांसाठी मॅनडेट दिले होते. यापूर्वी 15 वर्ष मध्यप्रदेशात भाजपला काम करण्यासाठी देण्यात आले होते. ते म्हणाले, मी निश्चित केले आहे की राज्यपालांकडे राजीनामा सोपावणार आहे.
कमलनाथ शुक्रवारी राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून देतील.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालने आपल्या आदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणीच्या माध्यमातून बहुमत स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की त्या 16 बंडखोर आमदारांंवर अवलंबून असेल की कमलनाथ सरकारकडे बहुमत आहे की नाही.
कमलनाथ यांनी सकाळी 11 वाजता आमदारांची बैठक बोलावली होती त्यानंतर दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपवर आरोप करत ते म्हणाले की आमच्या 22 आमदारांना प्रलोभने देऊन त्यांना बंधक बनवण्यात आले आहेय. त्यांच्यासोबत कोट्यावधी रुपयांच्या प्रलोभनाचा खेळ खेळण्यात आला. भाजपने असे करुन लोकशाहीच्या मूल्याची हत्या केली आहे. याआधी कमलनाथ राजीनामा देणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. याबद्दल जेव्हा राज्याचे वरिष्ठ नेता दिग्विजय सिंह यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की त्यांच्या पत्रकार परिषदेची वाट पाहणे योग्य ठरेल.
काँग्रेसचे मंत्री पीसी शर्मा आमदारांना फोडण्याबाबत म्हणाले की, ते हॉर्स ट्रेडिंग नाही तर एलिफेंट ट्रेडिंग करत आहेत. ते म्हणाले, आम्ही बहुमत सिद्ध करु आमच्याकडे फॉर्म्यूला 5 आहे. 12 वाजता पत्रकार परिषदेत सर्व काही स्पष्ट होईल. हे देखील सांगण्यात येईल की 6 आमदारांना कसे बंधक बनवण्यात आले. पत्रकार परिषदेपूर्वी मध्यप्रदेशचे विधानसभा सभापती म्हणाले, त्यांनी दुखी मनाने आमदारांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांच्याकडे याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. सभापतींनी आतापर्यंत 23 आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे.