नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदाराने सुनेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी माजी आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुनेने दिलेल्या तक्रारीवरून माजी आमदार मनोज शौकिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ डिसेंबर २०१८ रोजी पिडीत महिला, तिचा पती, भाऊ, आणि एक चुलत भाऊ असे काही जण तिच्या माहेरी आले होते. त्यानंतर ते मीरा बाग येथील आपल्या सासरी जात होते. परंतु घरी जाण्याऐवजी तिला पती विहार परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.
तेथे गेल्यावर काही नातेवाईक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पार्टी करत होते. त्यावेळी पार्टी झाल्यावर १ जानेवारी रोजी ठीक १२.३० वाजता मीरा बाग येथे आपल्या घरी आले. तेव्हा पती काही मित्रांसोबत बाहेर गेले. तेव्हा पिडीत महिला झोपण्यासाठी गेली. त्यानंतर दीड वाजता तिचे सासरे मनोज शौकीन यांनी दार उघडण्यास सांगितले. त्यानंतर काही बोलायचं असल्याचं सांगत त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीत येताच त्यांनी चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दारू पिलेली असल्याने मी त्यांना झोपायला जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पिस्तूल काढले. तिला चापट मारली. त्यानंतर तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत दुष्कर्म केले.
दरम्यान, आपलं नातं आणि भावाला वाचविण्यासाठी महिलेने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. तर आता साकेत कोर्टातील क्राइम अगेन्स्ट वुमन सेलमध्ये सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली आहे.