उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे बहिणीचे प्रेमप्रकरण समजल्याने संतापत भावाने बहिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीचा भाऊ, आई-वडील आणि आणखी दोन जणांना अटक करण्यात आले असून आरोपी पीडितेचा सख्खा भाऊ असल्याचे समजते आहे. एका वृत्तानुसार पीडितेचे नाव टीना चौधरी असून रविवारीच तिला तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी गंभीर झालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला मृत घोषित केले गेले. त्याबाबाबत पोलिसांना सांगण्यात आले. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी काही दरोडेखोरांनी शस्त्रांसह घरात शिरत तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. पण शवविच्छेदन अहवालात तिच्या जांघेत, गुप्तांगात आणि कमरेच्या वर तीन गोळ्या लागल्याचे दिले आहे. त्यामुळे तिचे कुटुंब काहीतरी खोटे सांगत असल्याचा संशय पोलिसांना आला.
त्यांनतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी मुलीच्या घरी जाऊन तपासणी केली, तेव्हा त्यांना घरात रक्ताचे थारोळे दिसून आले. त्यांना पुसायचा प्रयत्न झाला असल्याचे आणि आजूबाजूला काचेच्या बांगड्यांचे तुकडे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळकट झाल्यामुळे त्यांनी कुटुंबाची जास्तच कसून चौकशी केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने आपला गुन्हा कबूल केला.
गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत टिनाचे प्रेमसंबंध असताना ते तिच्या घरातल्यांना मान्य नव्हते. त्यामुळे तिचे आणि घरातील सदस्यांचे भांडणही व्हायचे. दरम्यान तिचे काका आणि तिचा चुलतभाऊ रविवारी घरी आले असताना त्यांना टिनाच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजले. तसेच तिला मुलासोबत असलेले संबंध संपवायला सांगितले असता तिने मुलासोबत लग्न करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण झाले आणि त्यातच संतापून टिनाच्या भावाने तिच्या गुप्तांगात गोळ्या झाडल्यावर तिचा जागेवरच मृत्यू झाला.