मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Bhai Jagtap | पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जात आहे. मात्र, शनिवारी मुंबईत झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण आंदोलनासाठी काँग्रेस नेत्यांबरोबर काही कार्यकर्ते देखील बैलगाडीत चढले होते. त्यामुळे बैलगाडी कोसळली. यावर भाजप नेत्यांनी टिका करण्याची संधी सोडली असती तरच नवल. भाजप नेत्यांनी शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली होती. मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप (Congress State President Bhai Jagtap) यांनीही मग भाजप (BJP)नेत्यांना खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते,
जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक अस्ते तर!
आज देशाची स्थिती अशी झाली नसती….— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) July 10, 2021
आंदोलनादरम्यान, बैलगाडी मोडून जमिनीवर कोसळल्यानंतर हसणार्या भाजप नेत्यांना भाई जगताप यांनी ट्विट करुन खडे बोल सुनावलेत. भाई जगताप म्हणाले की, माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक असते तर ! आज देशाची स्थिती अशी झाली नसती. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की,कदाचित राहुल गांधींना (Rahul Gandhi) राष्ट्रीय नेता म्हटलेले बैलांनाही आवडलेले नसावे.
‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार! माननीय भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, माणसाने झेपेल तेवढंचं करावं!’ असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!, अशी बोचरी टीका भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी केली होती.
Web Title : bhai jagtap responds to bjp leaders criticism after falling from bullock cart
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जळगाव जिल्ह्यातील जवान लेह लडाखमध्ये शहीद
DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांची पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट
Jimmy Shergill | अटकेप्रकरणी जिमी शेरगीलचा उलट आरोप; म्हणाला – ‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’