मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Jimmy Shergill | कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, कोरोनाच्या नियमाला धुडकावून चित्रपटाचं शूटिंग केलं असल्याने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल (Bollywood actor Jimmy Shergill) याला निर्बधांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यावरून अभिनेता शेरगिल याच्यावर सर्वत्र जोरदार टीका देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, या विषयावर भाष्य करत पोलिसांनी (Police) राईचा पर्वत केला असा उलट आरोप जिमी शेरगिल याने केलाय. jimmy shergill on breaking lockdown protocol
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘आम्ही सर्व नियमांचं पालन करूनच चित्रीकरण करत होतो. देशात काय चाललं आहे. याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. शिवाय आम्हाला आमच्या जिवाची काळजी देखील आहे. परंतु पोलिसांनी आणि त्यानंतर माध्यमांनी राईचा पहाड केला. फारच चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवल्या गेल्या आहेत. असं अभिनेता जिमी शेरगिल यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्याने एका मुलाखती दरम्यान अटकेमागचं असं कारण सांगितलं आहे.
दरम्यान, जिमी शेरगिल (Bollywood actor Jimmy Shergill) पंजांबमध्ये ‘युअर ऑनर 2’ या वेब सीरिजचं शूटिंग करत होता. एका शाळेत या वेब सीरिजचं शूटिंग (Shooting web series) सुरू होतं. त्यावेळी नाईट कर्फ्यू असतानाही रात्री 8 वाजल्यानंतर शूटिंग सुरु असल्याने पोलिसांनी सेटवर पोहचले. त्या ठिकाणी सेटवर जवळपास 100 लोक उपस्थित होते. या कारणाने करोनाच्या नियमावलीचं पालन न केल्याने जिमी शेरगिलसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला होता. तर पंजाबमध्ये (Punjab) देखील मागील काही दिवसात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळेच प्रशासनाने कडक प्रतिबंध लागू केले आहेत. अशातही रात्री 8 वाजल्यानंतर शूटिंग सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली होती.
Web Title : Chicago News | chicago schools provide free condoms students young 10 years old
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा
Covid 19 | हवेत आहे का कोरोना? आता ‘या’ डिव्हाईसने समजू शकते, जाणून घ्या कसं काम करतो