Supreme Court To Ajit Pawar NCP | ‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा, अन्यथा…, सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज

April 4, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court To Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) या दोन्ही पक्षांकडून घड्याळ या चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज सुप्रीम कोर्टाने निकाली काढेल आहेत. या सुनावणीत कोर्टाने अजीत पवार गटाला समज दिली आहे. घड्याळ चिन्हा विषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा न्यायालयाने अजित पवार गटाला दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिरात अजित पवार गटाने मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्यात तसेच निवडणुकीशी संबंधित प्रत्येक प्रचार पत्रक, ध्वनिमुद्रित संदेश आणि चित्रफितींमध्ये ‘न्यायप्रविष्ट’ असा उल्लेख करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 19 मार्च रोजी दिले होते.

न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन अजित पवार गटाने कुठल्याही वृत्तपत्रातून केलेले नाही. उलट निवडणूक प्रचार सुरु झाल्यावर न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळ वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करुन अजित पवार गटाने या आदेशाची थट्टा उडवली आहे, अशी तक्रार शरद पवार यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.

न्यायालयाचा आदेश स्पष्ट असून त्यातून दुहेरी अर्थ काढण्यास कोणताही वाव नाही, असे आज (गुरुवारी) न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथ यांच्या पीठाने बजावले.

…तोपर्यंत आदेशाचे पालन करा

19 मार्चच्या आदेशानंतर अजित पवार गटाने आतापर्यंत किती जाहिराती प्रसिद्ध केल्या आणि त्यातील मजकूर काय होता याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात काही जाहिराती दाखवल्या.

न्यायालयाच्या आदेशातील शेवटच्या ओळीत बदल करण्याविषयीचा अर्ज भविष्यासाठी केला आहे, असे रोहतगी यंनी म्हटले. परंतु निवडणूक संपेपर्यंत आदेशाचे पालन करावेच लागेल, असे नमूद करुन या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरात लवकर करण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले.

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती