नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू, दंगल गर्ल आणि भाजप नेता बबीता फोगाटने हरियाणा पोलीसातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबीता म्हणाली की, “मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी तुम्ही अशा कोणत्याही पदाचा राजीनामा गरजेचे असते. मी माझा राजीनामा 13 ऑगस्ट रोजीच दिला होता.
https://twitter.com/ANI/
गेल्या महिन्यात म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी बबीता फोगाट आणि तिचे पिता महावीर फोगाट यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा बबीताने आपल्या अकाऊंटवरून ट्विट केलं होतं की, “आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत राजकारणात नवीन सुरुवात करत आहे. तुम्हा सर्वांनाही आव्हान करते की, तुम्हीही भारतीय जनता पक्षात सामील व्हा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात मजबूत करा.”
https://twitter.com/ANI/
द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित महावीर फोगाट यांनी याआधी या वर्षाच्या सुरुवातीला अजय चौटाला यांच्या जननायक पक्षात प्रवेश केला होता. जखमी असलेली बबीता फोगाट सध्या मॅटपासून दूर आहे. राजकारणात आल्यानंतरही ती कु्स्ती खेळणं सुरूच ठेवणार आहे.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी