काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांनी कालच(बुधवार दि 11 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
‘अन्य उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना, मला स्वत:च्याच तिकीटाचा पत्ता नाही’
मुलाखतीत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत आम्ही सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी सहकार्य केलं. त्यांना इंदापूरातून 71 हजाराचा लिड मिळाला. राष्ट्रवादीचे नेते घरी आले त्यांनी विधानसभेत सहकार्याचं आश्वासन दिलं. दुसरीकडे मी स्वत: तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मुंबईत अन्य उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना, मला स्वत:च्याच तिकीटाचा पत्ता नाही. या विचारानं मी भांबावून जायचो. आमचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेतेही याबाबत स्पष्ट भूमिका घेत नव्हते. सोनिया गांधींचीही भेट झाली. आपण यात लक्ष घालू एवढंच त्यांनी म्हटलं.” अशीही खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘पक्षाच्या नेत्यांनाही कार्यकर्त्यांवर निष्ठा ठेवावी लागते’
पक्षनिष्ठेवर बोलातना पाटील म्हणाले की, “पक्षावर निष्ठा असली तरी पक्षाच्या नेत्यांनाही कार्यकर्त्यांवर निष्ठा ठेवावी लागते. शेवटी जनताच पक्ष वाढवते. त्यामुळे खरी निष्ठा जनतेशीच असते. माझ्यावर होत असलेला अन्याय इंदापूरच्या जनतेला सहन झाला नाही. त्यांनी मला निर्णय घेण्यास भाग पाडलं.”
‘अशोक चव्हाण जनतेच्या राजकारणात कमी, पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेण्यात उशीर करतात’
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतीत आपलं निरीक्षण मांडताना पाटील म्हणाले की, “अशोक चव्हाण बैठ्या राजकारणात तरबेज असले तरी जनतेच्या राजकारणात कमी पडतात. पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेण्यात उशीर करतात.”
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी