अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीला ‘या’ राज्यातील CM राहणार उपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पार्टी (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेले आहे. बुधवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित ‘आप’ आमदारांच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांना विधान पक्षाचा नेता म्हणून निवडण्याचा प्रस्ताव दिला, त्याला एकमताने मान्यता देण्यात आली.आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह आणि पंकज गुप्ता हे या बैठकीचे निरीक्षक होते. सर्वांनी अरविंद केजरीवाल यांना एका मताधिक्याने विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडले. केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला सर्व आपच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दर्शविला.
त्याचवेळी रामनिवास गोयल म्हणाले की, शपथविधी सोहळा 16 रोजी रामलीला मैदानावर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान रामलीला मैदानावर होऊ शकतो. पक्षाच्या काही लोकांना अशी इच्छा आहे की शपथविधी सोहळा 2015 प्रमाणे 14 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जावा, परंतु काही लोकांची इच्छा आहे की रविवारी हा कार्यक्रम असावा जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तथापि, शपथविधी सोहळा कधी होईल याची तारीख निश्चित नाही.
केजरीवाल यांच्या शपथविधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अन्य अनेक बिगर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री पोहचण्याची शक्यता आहे.
मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने भव्य विजय मिळविला आहे. दिल्लीतील 70 जागांपैकी 62 जागांवर कब्जा केला आहे. त्याचवेळी भाजपने केवळ आठ जागा जिंकल्या. मागील वेळेप्रमाणे या वेळीही कॉंग्रेसचे खाते उघडले नाही. एकूण मतांपैकी ‘आप’ला 53.6 टक्के वाटा मिळाला, तर भाजपाला 38.5 टक्के मते मिळाली. काँग्रेसचा वाटा केवळ 4.26 टक्के होता.
या भरघोस विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले आणि त्यांना जाहीरपणे ‘आय लव यू’ असे संबोधले. आम आदमी पार्टी दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल.
Comments are closed.