बहुजननामा ऑनलाईन – लवकर ‘अमेरिकन क्राईम स्टोरी’ चा ‘एफएक्स’ वाहिनीवर तिसरा सिझन सुरु होणार आहे. या तिसरी सिझनमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की यांचे प्रेमप्रकरण दाखवण्यात येणार आहे. हि सिरीज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी प्रदर्शित होणार असल्याने एकेकाळी तिथल्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या या सेक्स स्कॅडलची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
या सीरिजच्या मोनिका या निर्मात्या आहेत. निवडणुकांच्या जवळपास म्हणजेच २७ सप्टेंबर २०२० रोजी ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. या सिरीज बद्दल बोलताना नेटवर्क्सचे सीईओ जॉन लँडग्राफ म्हणाले, “मी स्क्रिप्ट वाचली असून मला ती फार आवडली आहे. माझ्या मते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर सीरिजचा काही परिणाम होणार नाही. ”
नक्की काय आहे १९९८ चे सेक्स स्कँडल
१९९८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की यांच्यातली सेक्स स्कँडलने अमेरिकेत वादळ आले होते. व्हाईट हाऊसमध्ये मोनिका ही इन्टर्न म्हणून काम करत होती. त्यावेळी मोनिकाचे वय २२ वर्ष होते. मोनिकाने प्रसारमाध्यमांमध्ये हा खुलासा केला होता की बिल क्लिंटन आणि मोनिका मध्ये १९९५ ते १९९७ पासून लैंगिक संबंध होते. हे संबंध दोघाच्याही सहमतीने प्रस्थापित झाले होते. मात्र मोनिकाने बिल क्लिंटन यांच्यावर गैरफायदा घेतल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला बिल क्लिंटन यांनी मोनिकाच्या सर्व आरोप फेटाळले. मात्र काही काळानंतर लैंगिक संबंध असल्याची बाब त्यांनी कबुल केली. या घडामोडीमुळे त्या दोघांची चांगलीच चर्चा झाली होती. आणि हा संपूर्ण प्रकरण जगभरात गाजला होता. बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावही आणला गेला होता. बिल क्लिंटन यांना काही काळानंतर या आरोपांतून मुक्त करण्यात आले होते.