बारामती : बहुजननामा ऑनलाईन – अजित पवारांनी बारामती मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. अजित पवारांविरोधात भाजपने आयात केलेले गोपीचंद पडळकर हे बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात आहेत.
पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. मागच्या ५० वर्षात बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करु शकलेला नाही.
अजित पवार यांच्यावर विविध आरोप होत असले तरी २०१४ सालच्या विजयाच्या मताधिक्क्यामध्ये फरक पडणार नाही असा त्यांना विश्वास आहे. भाजपने केलेले धनगर समाजाच्या मतांचे गणित बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासमोर सपशेल अपयशी ठरले आहे आणि अजित पवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. पुन्हा एकदा अजित पवारांनी विजयी गुलाल उधळून बारामती हा आपला बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे.
Visit : bahujannama.com