कणकवली : बहुजननामा ऑनलाइन – भाजप – शिवसेना पक्षासाठी महत्वाचा असणाऱ्या कणकवली मतदार संघात भाजपच्या नितेश राणे हे विजयी घोषित झाले असून शिवसेनेचे सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. नितेश राणे यांच्या विजयामुळे नितेश यांनी नारायण राणे यांची लाज राखल्याचे म्हंटले आहे.
राणे पिता पुत्रांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळेच कणकवली मतदार संघात महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये ही लढत रंगली होती. तरी नितेश राणे हे पहिल्या फेरी पासूनच बाजी मारत विजयाच्या वाटेवर होते. त्यामुळे शिवसेनेला राणे यांचा विरोध महागात पडल्याचे म्हंटले जात आहे.
नारायण राणे यांनी आपला स्वाभिमानी पक्ष भाजप मध्ये विलीन केला होता, त्यांच्या या प्रवेशावर शिवसेनेने विरोध दर्शविला होता. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेने बंडखोरी राणेंना पाठिंबा न देता आपला उमेदवार मैदानात उतरविला होता. तरी नितेश राणे यांनी विजय मिळवत गड राखला आहे.
Visit : bahuujannama.com