परळी : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाची असणाऱ्या परळी मतदार संघात मुंडे भाऊ – बहीण यांच्यातील लढत सर्वांच्या चर्चेचा विषय बनली होती. दरम्यान या लढाईत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी बाजी मारली असून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा प्रभाव झाला आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धनंजय मुंडे आघाडीवर होते. पंकजा मुंडे यांच्या पराभवाला त्यांनी मतदार संघाकडे केलेले दुर्लक्ष असल्याचे म्हंटले जात आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्यामानाने धनंजय मुंडे यांचा जनसंपर्क दांडगा होता असे म्हंटले जात आहे.
त्यामुळे परळी मतदार संघातील जनतेने भावाच्या बाजूने कौल दिला असून धनंजय मुंडे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. दरम्यान , ‘जनतेने दिलेला कौल मला मान्य असून मी पराभव स्वीकारत आहे, ‘असे मत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.
Visit : bahujannama.com