बहुजननामा ऑनलाईन टीम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे २९ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. लवकरच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र याआधी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोणला कोणते पद मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
अजित पवार यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मंत्री पदावरुन नेमके काय चालू आहे असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्यामध्ये उपमुख्यमंत्री पदावरुन कसलेच वाद नाही. लवकरच कॉंग्रेस आपल्या विधानसभा अध्यक्षाचे नाव घोषित करतील. मला पक्ष जी जबाबदारी देतील ती मी चांगल्याप्रकारे पार पाडेल. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदाबाबतची भावना कोणत्याही नेत्यांपासून लपलेली नाही. म्हणून राष्ट्रवादीतून अनेकांनी उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे नाव सुचवलेले आहे.
अजित पवारच प्रमुख दावेदार
राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुळे सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतून अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे.
Visit : bahujannama.com