बहुजननामा ऑनलाईन टीम : यंदा शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली होती. मात्र संजय राऊत यांना उद्ध ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पूर्ण पाहता आला नाही. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे संजय राऊत यांना शपथविधी सोहळा पुर्ण न पाहता अर्ध्यातून निघून जावे लागले. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला. पण संजय राऊत यांना तो पुर्ण पाहता आला नाही कारण मंचावर येण्यासाठी गर्दीतून वाट काढताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे राऊत यांना अस्वस्थ वाटू लागले.
त्यामुळे आराम करण्यासाठी संजय राऊत यांना मंचावरून निघून जावे लागले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे त्यांनी थोडा विश्राम केला आणि थोड्यावेळानंतर राऊत पुन्हा आले मात्र तोपर्यंत शपथविधी सोहळा पार पडला होता. निवडणुकीच्या निकालानंतर राऊत हे सातत्याने शिवसेनेची भूमिका मांडताना दिसले. 11 नोव्हेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली. 13 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
महाविकास आघाडीची आज परीक्षा –
शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाआघाडीच्या सरकारचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com