पोलीसनामा ऑनलाइन टीम – डास चावल्यानंतर त्या ठिकाणी त्वचेवर खाज येते आणि त्वचा लाल होते त्यावर सूज येते. या तर जाणून घेऊ डास का चावतात आणि डास चावल्याने खाज का येते आणि त्वचेवर सूज येते?
का चावतात डास?
जेव्हा डास माणसांना चावतात तेव्हा ते माणसाचं रक्त पितात आणि त्यांची लाळ त्या ठिकाणी सोडतात. ज्या ठिकाणी डास चावतात तिथं त्वचेवर सूज येते. डासांच्या लाळेत एंजाइम आणि प्रोटीनचं प्रमाण असतं. हे 19 एंजाइम, प्रोटीन आणि anticoagulants तुमच्या शरीरात एलर्जी निर्माण करतात.
डास चावल्याने का येते खाज
डास चावतात म्हणजे त्यांचा डंख मारतात त्यामुळे त्वचेवर छिद्र पडते आणि रक्त निघते. डास अशा प्रकारे चावतात कि जेनेकरून त्यांना रक्त पिता येईल आणि रक्त गोठू नये म्हणून एक विशेष प्रकारचं रसायन लाळेतून ते चावलेल्या ठिकाणी सोडतात. ही लाळ anticoagulants च्या रुपात काम करते. आणि सहज डास आपलं रक्त पिऊ शकतात. लाळेत असणाऱ्या रसायनामुळे त्या ठिकाणी त्वचेवर खाज येते आणि त्वचा लाल होते.
डास चावल्यास त्यावर हे 7 उपाय
1. मधाचा उपयोग
डास चावला तर त्या ठिकाणी मध लावल्यास त्वचेवरील सूज आणि खाज दोन्ही कमी होईल. मध अंटीसेप्टिकचं काम करतं त्यामुळे घाव भरण्यासाठी देखील ते उपयोगी आहे.
2. कोरफड लावणे
जर तुमच्या घरी कोरफडचं झाड असेल तर डास चावल्यास त्या ठिकाणी कोरफड लावा खाज कमी होईल आणि थंड वाटेल.
3. तुळशीचे पानं लावा
तुळशीचे पान जर डास चावलेल्या ठिकाणी लावले तर त्वचेवर खाज येत नाही, आणि थंड वाटतं. तुळशीच्या पानांचा रस डास चावलेल्या ठिकाणी तुम्ही लावू शकता.
4. टी बॅग चा उपयोग
ग्रीन- ब्लॅक टी बॅग मध्ये सूज कमी करण्याचे गुण असतात. वापरलेली टी बॅग फ्रीज मध्ये ठेवा थोड्या वेळाने डास चावलेल्या ठिकाणी ती बॅग लावा त्यामुळे डास चावून आलेली सूज कमी होईल.
5. दलियाचा वापर
जर तुमच्या घरात दलिया असेल तर दास चावलेल्या ठिकाणी लावा त्यामुळे खाज कमी होईल आणि सूज अली असेल तर ती देखील उतरेल.
6. लसूनचा उपयोग
घरी जर डास चावत असतील तर त्यामुळं होणाऱ्या खाजेवर एक चांगला घरगुती उपाय आहे. त्यासाठी तुम्ही लसूणाचा उपयोग करू शकता. लसूण मध्ये अँटिव्हायरल गुणधर्म असतात. लसणाची पेस्ट बनवून घ्या आणि ती पेस्ट डास चावलेल्या ठिकाणी लावा खाज कमी होईल. लासूणाची एक पाकळी घ्या त्यात खोबरेल तेल मिसळा ते देखील तुम्ही डास चावल्यानंतर त्वचेवर लावू शकता
7. लिंबाची पेस्ट
जर तुम्ही विचार करत असाल की डास चावण्यापासून कशी सुटका मिळवायची, तर तुम्ही लिंबाच्या पानांचा वापर करू शकता. लिंबाची काही पानं घ्या त्याची पेस्ट करा आणि ती डास चावलेल्या ठिकाणी लावा. याने तुमच्या त्वचेवर आलेली सूज देखील कमी होईल.