नवी दिल्ली : वृत्त संस्था – लग्न जुळविण्याच्या एका वेबसाइटवरून जवळपास २० महिलांची फसवणूक करणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. मेरठ येथून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. गौरव धमीजा असे या आरोपीचे नाव असून तो गाडीचे पार्टस विक्री करण्याचे काम करत होता. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी मुख्यतः विधवा किंवा घटस्फोटित महिलांना आपली शिकार बनवायचा. आणि वेबसाईट वर एक हँडसम व्यक्ती बनून दाखवत होता जो वर्षाला २५ ते ३० लाख रुपये कमावत होता.
साइबर सेल चे डीसीपी अन्येश रॉय यांनी सांगितले कि, “आरोपी विरुद्ध सायबर क्राईम युनिटवर तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने सांगितले कि, आरोपीने महिलेशी संबंध जोडले, ज्यानंतर महिलेकडून आपल्या खात्यावर पैसे जमा करून घेतले, नंतर आरोपीने पुन्हा महिलेला आपल्या जाळ्यात अडकवून , आपल्या पत्नीपासून तो पीडित असल्याचे दाखवले , आणि महिलेला महागड्या भेट वस्तू देणार असल्याचं भासवलं . ”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला जाळ्यात अडकवल्यानंतर त्याने सतत तिच्या कडून पैशांची मागणी केली, आई-बाबांची तब्येत खराब आहे , तसेच व्यवसायात नुकसान झाल्याच्या बहाण्याने त्याने महिलेकडून पैसे उकळले.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संबंधित कारवाई सुरु आहे.