अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – नगर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या सोबतच ९ जणांविरुद्ध आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत पीडित महिलेने तक्रार नोंदविली.
शहराचे माजी महापौर भगवान फुलसौंदर , गणेश फुलसौंदर , महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर तसेच अन्य पाच जणांविरुद्ध या महिलेने तक्रार दाखल केली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये सुरु असलेल्या जागेच्या वादावरून हा प्रकार घडल्याचे समजले आहे. पीडित महिला हि बुरूडगाव एका पडीक शेतात संध्याकाळी शेळ्या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी सर्व आरोपी त्या ठिकाणी गेले. तुमच्या कुटुंबियांना जागेचा वाद मिटवायचा आहे कि नाही ? असे सांगत आरोपींची महिलेला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण केल्यानंतर महिला जागीच बेशुद्ध झाली , याचाच फायदा घेत आरोपींची तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसात गेल्यावर ठार मारण्याची धमकी देखील दिली. अशी तक्रार महिलेने नोंदविली आहे . याप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान , जागेच्या वादावरून ह्या खोट्या गुन्हयात माजी महापौर भगवान फुलसौंदर आणि अन्य लोकांना अडकविले जात आहे. फुलसौंदर हे नगरचे पहिले महापौर आहेत त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे, त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविण्यासाठी हे कारस्थान रचले जात आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकारात विशेष लक्ष द्व्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली.