बहुजननामा ऑनलाईन – गुजरातमधील आनंद जिल्ह्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी घटना घडली. एका महिला न्यायाधीश आणि तिचा पती जिल्हा विकास अधिकाऱ्याने एका मुलीला दत्तक घेतले. त्या मुलीच्या आईचा मृत्यू तिच्या जन्माच्यावेळी झाला. त्यावेळी तिच्या वडिलांना खूप दुःख झाले मुलीचा सांभाळ कसा करायचा ? हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. कारण त्यांना आधी २ मुली आहेत. ही गोष्ट जिल्हा अधिकारी यांना समजली. त्यांनी लगेचच मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या पत्नी चित्रा यांनी त्यांना साथ दिली.
हे सगळे झाले कसे?
3 ऑगस्ट रोजी जिल्हा विकास अधिकारी अमित प्रकाश यादव रुग्णालयाच्या दौर्यावर होते. त्याचदरम्यान एका महिलेचा प्रेग्नेंसीच्यावेळी मृत्यू झाला. महिलेने मुलीला जन्म दिला होता. त्या दाम्पत्याची ती तिसरी मुलगी होती. वडील पुन्हा एकदा मुलगी झाल्याबद्दल काळजीत पडले.
अमित हे जिल्हा विकास अधिकारी आहेत. जर त्याच्या परिसरात एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर ते रुग्णालयात पोहोचतात. त्यादिवशी ते दौर्यावर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला फोन केला आणि तिला सर्व गोष्ट सांगितली. त्यांनतर दोघांनी त्या मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव माही ठेवले. मुलीचा जन्म माही नदीच्या ठिकाणी एक हॉस्पिटल होते तेथे झाला. त्यामुळे तिचे नाव माही ठेवण्यात आले.
अमित यांनी दिलेल्या माहितीनूसार, त्यांनी जेव्हा आपली पत्नी चित्रा यांना मुलगी उपाशी असल्याचे सांगितले तेव्हा चित्रा यांनी माहीला स्तनपान केले. आता मुलीची तब्बेत ठिक आहे. चित्राने मुलीला दत्तक घेतल्यामुळे त्यांचा परिवार खूप आनंदी आहे. मुलीच्या वडिलांनी तिला दत्तक देण्याची परवानगी दिली आहे. अमित आणि चित्राला एक ३ वर्षाचा मुलगा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, माही घरात आल्यामुळे त्यांचा परिवार परिपूर्ण झाला आहे.
अशा गोष्टी क्वचितच घडत असतात कारण लोक दुसर्या एखाद्या बाळाला दत्तक घेण्यापूर्वी त्यांची जात आणि धर्म याबद्दल विचारतात. परंतु येथे, एका अधिकाऱ्याने आपल्या पदासोबत माणुसकी दाखविली आणि मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
ऐसी खबरें सामने आती हैं तो एक बेहतर दुनिया की उम्मीद बंधती है.https://t.co/eLIbBoXrOi
— OddNaari (@OddNaari) August 18, 2019