नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी जाहीर झालेल्या दिल्ली सरकारच्या आरोग्य बुलेटिननुसार, गेल्या 24 तासात 1475 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह आता संक्रमित लोकांची संख्या 1 लाख 21 हजार 582 वर पोहचली आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्या 3597 झाली आहे. गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली आरोग्य मंत्रालयाच्या गेल्या 24 तासांच्या आकडेवारीनुसार, शनिवारी 1973 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दिल्लीत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या लाखाच्या वर गेली आहे. दिल्लीत आतापर्यंत 1 लाख 01 हजार 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचवेळी दिल्लीत 16 हजार 711 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील रिकव्हरी रेट 84 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
6246 RTPCR/CBNAAT/TrueNat tests and 15412 Rapid antigen tests conducted today. A total of 7,98,783 tests have been done so far: Government of Delhi https://t.co/guWd70jC2r
— ANI (@ANI) July 18, 2020
दिल्लीत आज 21 हजार 658 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी आरटीपीसीआर/सीबीएनएटी/ट्रायनाद्वारे 6246 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे 15412 नमुन्यांची तपासणी घेण्यात आली. आतापर्यंत राजधानी दिल्लीत 7 लाख 98 हजार 783 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. दर दहा लाख लोकांमागे 42041 नमुन्यांची तपासणी केली जात आहे.