बहुजननामा ऑनलाईन : राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. अशातच नाशिक ( nashik ) शहरात कोरोनाची दाहकता कायम असून मनपाच्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडे समोर आले आहेत. शहरातील दीड लाख नागरिक (citizens) चक्क हाय रिस्क झोन (high risk zone) मध्ये असल्यामुळे खळबळ माजली आहे.
नाशिक (nashik) शहरात कोरोनाबाबत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. तब्बल साडेतीन लाख नागरिक बाधितांच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये 1 लाख 48 हजार हाय रिस्क तर 1 लाख 99 हजार लो असल्याची नोंद आहे. अशी परिस्थिती असताना हे सर्वेक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या अंगणवाडी सेविकांना चक्क आंदोलन करावे लागले आहे.
कोरोना बाधितांनी शहरात 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मात्र तब्बल 46 हजार रुग्ण बरे झाल्यामुळे मोठा दिलासा मानला जात आहे. जवळपास 200 टीम्सच्या माध्यमातून मिशन झिरो प्रोजेक्टची अंमलबजावणी केली जात असली तरी जोपर्यंत नागरिक स्वतःहून याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे.