पुणे : बहुजननामा ऑनलाईन-देशात सध्या सामाजिक व राजकिय परिवर्तन घडत असुन त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्रात अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी विविध पक्ष व संघटनांची मोठ बांधुन वंचित बहुजन आघाडी स्थापन करून आगामी निवडणुकित वंचित घटकांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयास सुरू केला आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात सकल मराठी समाजाच्या वतीने गेली 4 वर्षे विविध सामाजिक प्रश्नांवर कार्यक्रम,आंदोलने या माध्यमातुन जनजागृती व परिवर्तन करित आहे, परंतु सर्व सामाजिक प्रश्न हे फक्त आंदोलनातुन सुटणार नाहित तर यासाठी संसदिय राजकारण हा प्रमुख मार्ग आहे.हेच ओळखून सकल मराठी समाजाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला असुन तसा मागण्यांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीतील भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशअध्यक्ष अशोक सोनाने यांच्याशी झालेल्या बैठकित सादर करण्यात आला अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत सकल मराठी समाजाचे समन्वयक राजेश खडके यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत सकल मराठी समाजाच्या वतीने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पुणेशहर कार्याध्याक्ष प्रफुल्ल गुजर, लहुजी संघर्ष सेनेचे विकास सातारकर, सम्राट अशोक सेनेचे विनोद चव्हाण, बहुजन मोर्चाचे मनोज खंडागळे, रिपब्लिकन मातंग सेनेचे अमोल तुजारे, क्रांती मजदुर सेनेचे अर्जुन ओव्हाळ, कबिर विचार मंचाचे शरद गायकवाड तसेच अंकुश गायकवाड उपस्थित होते.
या प्रस्तावात सकल मराठी समाजाच्या वतीने प्रस्ताविक मागण्या पुढील प्रमाणे-ः
१) मुंबई विद्यापिठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.
२) दादरचे नामांतर चैत्यभुमी असे करावे.
३) भारत देशात संपुर्ण शिक्षण क्षेत्रात भारतीय संविधान हा विषय बालवाडीपासुन सक्तीने शिकविण्यात यावा.
४) भारतातील संपुर्ण नद्या एकमेकाला जोडुन नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा.
५) शेतमालाची साठवणुक करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावरती गोदाम (गोडाऊन) उभारण्यात यावेत.
६) नाशवंत शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शीतग्रृह (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यात यावेत.
७) शासकिय क्षेत्रातील कामकाजात आऊट सोर्सिंग पध्दत बंद करण्यात यावीत.
८) प्रत्येक तालुका स्तरावर एमआयडीसी झोन निर्माण करून स्थानिक भुमी पुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
यासाठी संसदिय राजकारण म्हणुन पुणेशहर जिल्ह्यातुन सकल मराठी समाजासाठी पाच जागा पुढील प्रमाणे राखीव ठेवण्यात याव्यात.खडकवासला,भोर-वेल्हा-मुळशी,कसबा,हडपसर आणि वडगाव शेरी अशी प्रस्ताविक मागणी आहे.
सदर मागण्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असुन वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटीकडुन यावर लवकरच निर्णय घेऊन तो जाहीर केला जाईल असे भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अशोक सोनाने यांनी सकल मराठी समाजास आश्वासित केले असल्याची माहिती सदर पत्रकार परिषदेत देण्यात आली.