पुणे : बहुजननामा ऑनलाइन – (ऋषिकेश कारभाजन) –भीमा कोरेगाव येथे २०० वर्ष पूर्वी झालेल्या लढाईत धारातिर्थी पडलेल्या दलित सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. दरम्यान १ जानेवारी २०१८ ला काही समाज कंटकांनी हिंसाचार घडवून आणला होता. इतकेच नव्हे तर त्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे यावेळी असा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यंदा १ जानेवारी २०१९ ला पोलीस प्रशासनाने ५ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे यंदा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावरूनच पोलिसांचा हा एकप्रकारे विजयच म्हणावा लागेल.
ऐतिहासिक विजयदिन
पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध दलित संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात.
१ जानेवारी २०१८ ला झालेला हिंसाचार
दरम्यान १ जानेवारी २०१८ ला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसाचार झाला होता. इतकेच नव्हे तर त्या दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.
अन… तस काही घडलंच नाही
दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातून लाखो अनुयायी येत असतात, मात्र गेल्या वर्षी १ जानेवारील २०१८ ला झालेल्या हिंसाचारामुळे यावर्षी एवढ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येतील असे वाटले नव्हेते, मात्र यावर्षी कधीही कोरेगाव भीमा येथे न आलेले अनुयायी देखील आभिवादन करण्यासाठी आले होते. इतकेच नव्हे तर कोरेगाव भीमा येथील स्थानिकांनी कुठलीही भीती, तसेच कुठल्याही प्रकारचा द्वेष न बाळगता अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांचे त्याच उत्साहाने स्वागतही केले. विशेष म्हणजे ज्या गोष्टीची पोलिसांना भीती वाटत होती तसा एकही अनुचित प्रकार यावर्षी घडला नाही त्यामुळे पोलसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
कोरेगाव भीमा येथे दोन्ही पोलीस पाटलांनी पहाटेपासूनच ठोकला होता तळ
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक दाखल झाले आहेत. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी, पाटील पहाटेपासूनच कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसले होते. तसेच अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.
पुणे पोलिसांची चोख सुरक्षा व्ययस्था
-१२ एसआरपीएफच्या तुकड्या
– १२०० होमगार्ड
– २ हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक
– घातपात विरोधी पथक
– जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट
– ७ बीडीडीएस टीम्स
– ४० व्हिडीओ कॅमेरे
– १२ ड्रोन कॅमेरे
– विजयस्तंभाच्या७ – ८ किमी परिसरात ३०६ सीसीटीव्ही कॅमेरे
– २०० रुग्णवाहिका
इतर व्यवस्था
– १५० पीएमपीएमल आणि खासगी बसेस
– ३०० मोबाईल टॉयलेट
– जड वाहनांची वाहतूक वळवली
– पार्किंगसाठी ११ ठिकाणी रस्त्यांवर बॅरिकेटिंग