काही दिवसांपूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले होते. दरम्यान मराठा आरक्षणा नंतर मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजांनीही आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह धनगर समाजातील प्रतिनिधी आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा कारणार होते. दरम्यान ही भेट झाल्या नंतर धनगर आरक्षणा बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर धनगर आरक्षणा बाबत काही दिवसातच गुड न्यूज मिळणार आहे, तसेच “धनगर आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सकारात्मक अहवाल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर आरक्षण देणार”आहेत. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे धनगर आरक्षणासाठी सर्व पक्षातील धनगर आमदारांसह मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर मंत्री नव्हतो तेव्हा माहिती नव्हते पण आरक्षणासंदर्भातील तांत्रिक बाजू कळत असल्याची कबुलीही जानकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.