नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाओमी (Xiaomi) Mi 10 ची नवीन सिरीज कंपनीने सादर केली आहे. कंपनीने अलीकडेच Mi 10 स्मार्टफोनची सिरीज चीनमध्ये लाँच केली. या फोनचा पहिला सेल 14 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आला होता. या 5 जी फोनमधील 108 मेगापिक्सल कॅमेरा असल्याने काही मिनिटात हे फोन विकले केले. एका वृत्तानुसार या फोनने 1 मिनिटात 2000 मिलियन युवानचा आकडा गाठला. म्हणजेच भारतीय रुपयात 200 कोटींपेक्षा जास्त. शाओमीच्या म्हणण्यानुसार हा फोन Tmall, JD. आणि झिओमी या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. फोनचा पुढील सेल 21 फेब्रुवारीला असेल, असेही कंपनीने सांगितले.
Mi 10 ची किंमत
या स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. 8GB रॅम+ 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत 40,800 रुपये आहे. तर 8GB रॅम+ 256GB स्टोरेज असलेले वेरिएंटची किंमत 44,000 रुपये आहे. तर 12GB रॅम+ 256GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 48,000 रुपये आहे.
Mi 10 मध्ये ही वैशिष्ट्ये आहेत
चीनमध्ये लॉन्च झालेल्या Mi 10 मध्ये 6.7 इंचाची AMOLED डिस्प्ले आहे, जो रिफ्रेश दर 90Hz सह येतो. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा कॅमेरा, ज्याला 108 मेगापिक्सलसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, दोन 2-मेगापिक्सेलचे मागील कॅमेरे आहेत. सेल्फी फोनमध्ये 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 8 के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. यात 4,780 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंगने चार्ज होते.