औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून एका दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाला आहे. या अपघात पाठीमागून येणाऱ्या बसने महिलेला चाकाखाली चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा यात जागीच मृत्यू झाला. ही महिला व्यायामशाळेत जात असताना हा अपघात घडला. जालना रोडवरील रामनगर येथे सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव ललिता शंकर ढगे (३९ रा कासलीवाल पूर्व चिकलठाणा) आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ललीता यांचे पती शंकर हे वाळूज एमआयडीसीतील कंपनीत व्यवस्थापक आहेत. पतीला सोडल्यानंतर त्या दुचाकीने व्यायामशाळेत निघाल्या होत्या. सव्वा आठ वाजेच्या सुमारास मागून वेगात आलेल्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने ललीता यांचा जागेवरच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत ललिता यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. ललीला यांच्या मागे पती, मुलगी आणि मुलगा आहे. अपघातानंतर बसचालक बससह घटनास्थळवरुन फरार झाला आहे. दरम्यान, याविषयी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस करीत आहेत. या अपघातामुळे ललिता यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.कुणीतरी रसत्यावर अशा प्रकारे केबल सोडली होती. पण कोणाच्या बेजाबदार पणामुळे या महिलेला आपला जीव गमवावा लागला.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा