मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे विरोध करीत आहेत त्यांनी दोन दिवस अंदमान येथील तुरुंगात जाऊन राहावे. तेव्हाच त्यांना सावरकरांच्या बलिदानाची, त्यागाची जाणीव होईल, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावरकरांचा मुद्दा पुन्हा एकदा तापवला आहे. राऊत यांनी वरील वक्तव्य करून काँग्रेसला सुनावल्याचे म्हटले जात आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर मोठे वादळ उठले होते. त्यानंतर मोदी सरकारने सावरकारांना भारतरत्न दिला तर आम्ही विरोध करू, असे पृथ्वराज चव्हाण यांनी म्हटले होते. त्यामुळे राऊतांनी हे खडे बोल काँग्रेसला सुनावले आहेत.
वीर सावरकरांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून काँग्रेसवर निशाणा साधला होता. यात राऊत यांनी म्हटले होते की, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागबद्दलही अनेकही शंका उपस्थित केल्या जातात. पण सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशत्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेल यांच्या वाट्याला आल्या नाहीत.
सावरकारांनी माफी मागितल्याच्या वादग्रस्त उल्लेखाबाबत राऊत यांनी म्हटले होते की, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली, असे बोलले जाते परंतु ते अर्धसत्य आहे. त्यांनी माफी मागितली सुद्धा असेल, यात काय चूक केली. ब्रिटिश राजवटीत कोणी प्रसंगानुसार देशभक्त बनला तर कोणी अपघाताने. परंतु सावरकरांचे क्रांतिकार्य अमर आहे. 14 वर्षे अंदमानात त्यांनी यातना भोगल्या. अटी शर्तींवर त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. सावरकरांनी बाहेर यावे, ही सगळ्यांचीच इच्छा होती.
सावरकरांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा ठोठावली असती तर सावरकर हसत हसत फासावर गेले असते. सावरकरांनी मृत्यूला अनेकद चकवले. त्यांनी अंदमाननंतरचे रत्नागिरीतील आयुष्यही राष्ट्रीय कामासाठीच अर्पण केले, अशा शब्दात संजय राऊत यांनी सावरकरांवर टीका करणार्यांना उत्तर दिले होते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा