औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांना संशयास्पद पाकिट पाठविण्याच्या प्रकरणात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी सांगितले की, तपासादरम्यान मध्यप्रदेश एटीएसला आढळून आले की, नांदेड जिल्ह्यातील धानेगाव परिसरातील डॉक्टर सैयद अब्दुल रहमान खान (35) याने हे संशयास्पद पाकिट ठाकुर यांना पाठवले होते. रहमान हा या परिसरात आपले क्लिनिक चालवतो.
काकडे यांनी सांगितले की, मध्यप्रदेश एटीएसने रहमान खानला गुरूवारी ताब्यात घेतले होते. तो मागील तीन महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर होता. कारण यापूर्वीही काही सरकारी अधिकार्यांना त्याने पत्र लिहिली होती, ज्यात त्याने दावा केला होता की, त्याची आई आणि भाऊ दहशतवाद्यांच्या संपर्कात असून त्यांना अटक करण्यात यावी. काकडे यांनी सांगितले की, ही पत्र पाठविल्याबद्दल रहमानला यापूर्वीही अटक झाली आहे.
पाकिटात होता विषारी रासायनिक पदार्थ
भोपाळ लोकसभा मतदार संघाच्या भाजपा खासदार ठाकुर यांनी सोमवारी भोपाळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांना कोणीतरी पत्र पाठविली होती, ज्यामध्ये विषारी रासायनिक पदार्थ होते. पोलिसांनी ठाकुर यांच्या निवासस्थानी जाऊन तीन चार पाकिटे जप्त केली, ज्यामध्ये उर्दूमध्ये काहीतरी लिहिले होते.
यापूर्वीही डॉक्टरला झाली होती अटक
पोलीस अधिकार्याने सांगितले की, पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशनद्वारे त्याच्यावर पाळत ठेवली होती. परंतु, तो मोबाईल फोन घरीच ठेवून ही पत्र पोस्ट करण्यासाठी औरंगाबाद, नागपुर आणि अन्य ठिकाणी जात होता. रहमानचे आपल्या भावासोबतही भांडण आहे आणि भावाला मारहाण केल्यामुळे त्याला यापुर्वी अटक झाली होती.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा