शिर्डी : बहुजननामा ऑनलाईन – संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साई बाबा मंदिर उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एव्हढेच नाही तर हे मंदिर उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे साईबाबांच्या शिर्डीतील भक्तांना त्रास झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विधानावर साईबाबा मंदिर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आणि मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली आहे.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथेही सभेत बोलताना पाथरी गाव साई बाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिर्डीवासीयांमध्ये तीव्र संताप असून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत साईबाबा संस्थान ट्रस्ट चे बी . वाकचोरे यांनी म्हंटले आहे की आम्ही १९ जानेवारीपासून शिर्डी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
परंतु, या सर्वांमधून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही. यावेळी मंदिर खुले राहील, परंतु भाविकांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची किंवा पूजा करण्याशी संबंधित कोणतीही सुविधा मिळणार नाही असे सांगितले आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेला उद्देशून असे म्हटले होते की, परभणी जिल्ह्यालगत असलेल्या पाथरी या गावी जिथे साई बाबा जन्माला आले होते ,सरकार तेथे 100 कोटींची विकास कामे करेल आणि लवकरच हा प्रकल्प राबविला जाईल. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर एकीकडे पाथरी गावचे लोक एकीकडे या घोषणेचा आनंद व्यक्त करीत आहेत तर दुसरीकडे , शिर्डीत या गोष्टीला विरोध केला जात आहे.
शिर्डीतील बंदमुळे येथील भाविकांना मोठी समस्या भेडसावू शकते, कारण हजारो भाविक रोज साईबाबांच्या दर्शनासाठी येथे दाखल होतात. केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूंनाही साईबाबांवर खूप श्रद्धा आहे. म्हणून दोन्ही धर्मातील भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिरडीला पोहोचतात. अशा स्थितीत या बंदमुळे भाविकांना त्रास होऊ शकेल.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा