नवी दिल्ली : वृत्त संस्था – WhatsApp |व्हॉट्सॲप (WhatsApp) सध्या अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे. यापैकी काही फिचर्सचे अजूनही टेस्टिंग केली जात आहे. कंपनीनुसार, यापैकी काही फिचर्स(features) लवकरच यूजरच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. या फिचर्समध्ये फोटो क्वालिटी, लिंक प्रीव्ह्यू, मल्टी-डिव्हाईस सपोर्ट आणि व्ह्यू वन्स (View Once) सारख्या फिचरचा समावेश आहे.
whatsapp soon to launch these exciting features in app view once in app notification voice waveform
व्हॉट्सॲप (WhatsApp) सध्या अनेक अशा फिचर्सवर काम करत आहे, जी लवकरच अँड्राईड आणि आयओएसमध्ये समाविष्ट केली जातील. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ही फिचर्स यूजर्ससाठी उपलब्ध करून दिली जातील. व्हॉट्सॲपमध्ये येणार्या या फिचर्सबाबत जाणून घेवूयात…
In-App नोटिफिकेशन पुन्हा डिझाईन केले :
WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप इन-अॅप नोटिफिकेशन चांगले बनवण्याचे काम करत आहे.
View Once फिचर
व्हॉट्सॲपने आपल्या बीटा अॅपमध्ये व्ह्यू वन्स फिचर सुद्धा रोल आऊट करण्याचे काम सुरू केले आहे. या फिचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ समोरील यूजर केवळ एकदाच पाहू शकतो, ज्यानंतर ते आपोआप डिलीट होईल. मात्र, या फिचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडिओचे स्क्रीनशॉट ब्लॉक केलेले नाही.
व्हॉईस वेव्हफॉर्म
व्हॉट्सअॅप आता एक व्हॉईस वेव्हफॉर्म नावाचा एका फिचरवर सुद्धा काम करत आहे, जे यूजरने व्हॉईस मेसेज ऐकल्यानंतर प्रोग्रेस बारऐवजी व्हॉईस वेव्ह फॉर्म दाखवेल. सध्या हे फिचर्स केवळ iOS साठी तयार केले जात आहे. हे फिचर अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे आणि येत्या काही दिवसात ते बीटा टेस्टर्ससाठी रोल आऊट केले जाईल.
Web Title : whatsapp soon to launch these exciting features in app view once in app notification voice waveform
Pune Crime News | खडकी परिसरात दोन इराणी गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
Corona Vaccine | कोरोनाची लस घेतल्यानंतर किती दिवस सेक्स करू नयेः जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला