पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | खडकी परिसरात (Khadki Area) दोन इराणी गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चुगल्या करते म्हणून एका महिलेला 10 ते 15 जणांनी मारहाण केली. तर त्यानंतर पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एकाला 15 ते 20 जणांनी बेदम मारहाण केली आहे.
याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) सकिना फिरोज इराणी (वय 49) यांच्या तक्रारीवरून 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर जैनब इराणी (वय 37) यांच्या तक्रारीवरून 15 ते 20 जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
खडकी पोलिसांनी (Khadki Police) दिलेल्या माहितीनुसार, जैनब यांच्या तक्रारीनुसार ते त्यांच्या महात्मा गांधी वसाहतीतील घरासमोर कुटुंबासह बसले होते. यावेळी आरोपी सकीना फिरोज इराणी आणि फाथीमा कजन इराणी त्या ठिकाणी आल्या. त्यांनी तू पोलिसांची खबरी आहेस, तू आमच्या बाबत खोटी माहिती पोलिसांना गुपचुप देत असते, असा आरोप करत वाद घातला. तर येथे जमत इतर आरोपींनी दोघांच्या घरावर दगडफेक करत हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. तर सकीना यांच्या तक्रारीनुसार, यातील आरोपींनी फिर्यादी यांना तू आमच्या बद्दल बाहेर चुगल्या करते असे म्हणत वाद घातला. तसेच, 10 ते 15 महिला व पुरुष येऊन त्यांनी गोंधळ घालून त्यांना बेदम मारहाण केली आहे.