लखनौ : वृत्तसंथा – पोलिसांनी आपला गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोपी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे. प्रियंका गांधी या दोन दिवसांच्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या दौऱ्यावर आल्या आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन करणाऱ्या आयपीएस अधिकारी दारापुरी आणि काँग्रेस प्रवक्ते जफर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी निघाल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितली आहे.
आपण निवृत्त पोलीस अधिकारी दारापुरी यांच्या कुटुंबियांना भेटायला जात असताना वाटेत जागो जागो अडविण्याचा प्रयत्न केला. आपण गाडीतून जात असताना अचानक पोलिसांची गाडी आडवी येऊन आपल्याला अडविण्यात आले. गाडीतून खाली उतरविण्यात आले. लोहिया रोडवर आपला गळा दाबत आपल्याला धक्का दिल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
शेवटी त्यांनी काँग्रेसचे नेते धीरज गुर्जर यांच्या स्कुटीवर बसून त्या पुढे गेल्या. पुढे त्यांचा पुन्हा रस्ता अडविला. तेव्हा त्यात पायी चालत इंदिरानगर येथील दारापुरी यांच्या घरी पोहचल्या. दारापुरी हे ७७ वर्षाचे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी शांततापूर्वक आंदोलन करा अशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती़ तरीही पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाही विरोधात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी आपण उभे राहणार आहे. हा माझा निश्चय आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी आहे. मी कोठे जावे, हे भाजपा सरकार ठरवूू शकत नाही.
प्रियंकाच्या आरोपाचा लखनौचे एसएसपी कलानिधी नथानी यांनी इन्कार केला. प्रियंका गांधी यांच्याबरोबर कोणीही धक्का बुक्की केली नाही. त्यात निर्धारित रोडऐवजी दुसऱ्या रोडने जात होत्या. म्हणून पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने विचारणा केली. सुरक्षा आणि ट्रॉफिकच्या दृष्टीने ही माहिती आवश्यक होती. त्यांना पाडणे आणि गळा दाबणे हे असत्य आहे. पोलिसांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले.