बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. पुन्हा एकदा सारा चर्चेत आली आहे. अलीकडेच ती सुशांत सिंह राजपूत केसमधील (Sushant Singh Rajput) ड्रग्ज कनेक्शनमुळं चर्चेत आली होती. आता आपल्या एका व्हिडिओमुळं तिनं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे.
साराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती स्पॉट झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. अशात एका फोटोग्राफरनं तिला नमस्तेवाली पोज द्यायला लावली तर तिनं त्याला जबरदस्त उत्तर दिलं आहे. सध्या साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
कॅमेऱ्यासमोर पोज देताना एकानं साराला म्हटलं की, साराजी नमस्तेवाली पोज द्या. यावर उत्तर देताना सारा म्हणाली, नमस्ते ही माझी पोज नाही. यानंतर तिनं जाताना नमस्ते करून स्माईल करत पोजही दिली आहे. सध्या हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं शॉर्ट डेनिम आणि पिंक शर्ट घातला आहे. यात ती खूपच हॉट अँड बोल्ड दिसत आहे.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.