बहुजननामा ऑनलाइन टीम – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( underworld don Dawood Ibrahim) 7 मालमत्तांचा ( properties) लिलाव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला. त्यापैकी रत्नागिरीतील दाऊदच्या वडिलोपार्जित बंगल्याचाही लिलाव झाला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी हा बंगला केवळ 11 लाख 20 हजारांना विकत (bungalow-bought-by-delhi-
मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम याच्या 7 पैकी 6 मालमत्तांचा लिलाव झाला आहे. मात्र, 7 वी मालमत्तेच्या लिलाव झाला नाही. इकबाल मिर्चीच्या मालमत्तेवर बोली लागली नाही. दाऊदचे घर आणि शेतीचा डिजिटल पद्धतीने मुंबईतून लिलाव झाला. मात्र, लिलावात मुंबके गावातील (Mumbake Village Khed) शेतकरी सहभागी झाले नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली. सेफमातर्फे दाऊदची वडिलोपार्जित जमीन आणि घरांचा लिलाव केला. यापूर्वी मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव केला होता. रत्नागिरीतील त्याची कौटुंबिक जमीन आणि घराचा ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्यात आले.
दाऊदच्या आईच्या नावावर एक घर
मुंबके गावातील मालमत्ता ही दाऊदची आई अमीना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव झाला. कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित जमीन सध्या त्याचे काका कसत आहेत. पण, आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली. सेफमाचे संबंधित अधिकारी सय्यद मुनाफच्या माहितीनुसार दाऊदच्या एकूण 17 प्रॉपर्टी शिल्लक आहे. त्यातल्या 7 पैकी 6 मालमत्तांचा लिलाव झाला. कोरोनामुळे फक्त ई-ऑक्शन आणि टेंडर मार्फत लिलाव झाला.