बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. या काळात ती सोशलवर अॅक्टीव्ह दिसत आहे. करीना तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिनं प्रेग्नंसीमध्ये योगा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले होते जे सध्या चर्चेत आहेत. कारण करीनाला यासाठी ट्रोलही केलं जात आहे.
करीनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात ती काही योगा पोज करताना दिसत आहे. हे फोटो तिचे प्रमोशनल फोटोशुट दरम्यानचे आहेत. यात करीना ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. फोटोत करीना वेगवेगळ्या योगा पोज करताना दिसत आहे. काही फोटोत करीना पिंक वर्कआऊट आउटफिटमध्ये दिसत आहे. योगा करतानाच ती आपलं बेबी बंप फ्लाँट करतानाही दिसत आहे.
करीनाचा हा अंदाज काहींना रुचला नाही. काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. बेबी बंप फ्लाँट करत योगा करतानाचे तिचे फोटो पाहून अनेकांनी भलत्याच कमेंट केल्या आहेत. एकानं लिहिलं की, प्रेग्नंट तर नाही, पण माझाही लुक करीना सारखाच येतो. एक तर असंही म्हणाला. कलियुग आहे. हेच पाहणं बाकी होतं.
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अंग्रेजी मीडियम सिनेमात काम केलं आहे. हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.