बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात संबंधित तरुण (Pune Rural News)थोडक्यात बचावला असून घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले होते. यामध्ये प्रविण गोकुळ गव्हाणे या युवकावर झालेल्या गोळीबार व खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी एन.के.साम्राज्य ग्रुपच्या सदस्यांना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
याबाबत स्थानिक गु्न्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२६ जानेवारी रोजी शिरुर शहरात सी.टी.बोरा कॉलेज रोडवर मोटारसायकलवर येउन अज्ञात व्यक्तींनी प्रविण गव्हाणे याच्यावर हल्ला करत, गोळीबार केला होता.त्यानंतर हल्लेखोर पळुन गेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखत घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांनी भेट घेत तपास सुरु केला होता.
निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप,मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप,गणेश चंद्रकांत कुर्लप(सर्व रा.कामाठीपुरा,शिरुर), महेंद्र येवले(रा.सोनारआळी,शिरुर),गोपाळ संजय यादव,राहुल पवार(रांजणगाव) यांनी प्रविण गव्हाणे हा गोपाळ यादव याचा खुन करणार आहे असा चुकिचा समज करुन घेउन व एन.के.साम्राज्य या ग्रुपचे वर्चस्व वाढविण्याकरिता गव्हाणे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कट केला होता. तशी सुपारी दिली होती.त्यानुसार गव्हाणे याच्यावर कॉलेजरोडवर हल्ला करण्यात आला.त्यात गव्हाणे हा थोडक्यात बचावला.
दरम्यान,गुन्हयातील आरोपी गोपाळ यादव व अभिजित उर्फ जपानी कृष्णा भोसले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सासवड येथुन ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक तपास केला असता यादव याने प्रविण गव्हाणे याला मारण्यासाठी शुभम सतीश
पवार(रा.पापडेवस्ती,भेकराईनगर,
या गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,सहायक फौजदार दत्ताञय गिरमकर,राजु पुणेकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके,राजु मोमीन,अजित भुजबळ,विजय कांचन,गुरु जाधव,मंगेश थिगळे,धीरज जाधव,अक्षय नवले,बाळासाहेब खडके,दगडु वीरकर,समाधान नाईकवर यांच्या पथकाने तपास केला.
या गुन्हयातील आरोपींनी तसेच एन.के.साम्राज्य ग्रुपच्या सदस्यांनी कोणावर ,कुठे अत्याचार केलेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे येउन तक्रारी द्याव्यात असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.