नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि पालघर या जिल्हा परिषदांचे निकाल आज जाहीर होणार असून मंगळवारी झालेल्या या मतदानाची मतमोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरु झाली आहे. यामध्ये नितीन गडकरींचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथे कॉंग्रेसचे उमेदवार महेंद्र डोंगरे हे विजयी झाल्याने गडकरींना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. सर्व जिल्हा परिषदांमध्ये पक्षातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजपसाठी नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जात होती. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीसाठीही ही निवडणूक महत्वाची लढाई मानली जात आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ गटांसाठी २७० उमेदवार रिंगणात असून १३ पंचायत समितीच्या ११६ गटांसाठी मतदान झाले. मागील निवडणुकीत भाजपला १२ पैकी ११ जागा तर काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली होती. परंतु २०१९ मध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या आहेत.
लाईव्ह अपडेट्स –
– पारडसिंगा जिल्हा परिषद – चंद्रशेखर कोल्हे, राष्ट्रवादी विजयी,
– राष्ट्रवादी- तीन विजयी
– लाडगाव – राष्ट्रवादी निलिमा ठाकरे विजयी
– चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी या मुळ गावातंही भाजप विरोधी मतदान, कोराडीतून काँग्रेसचे नाना कंभाले विजयी
– भाजप – चार आघाडीवर
– पारडसिंगा शेकाप उमेदवार धम्मापाल खोब्रागडे विजयी
– एकूण 13 पंचायत समित्या, 116 गण
– चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलल्याने मतदारांची भाजपवर नाराजी कायम
– मेटपांजरा सर्कल मधून विजयी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलिल देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
– काँग्रेस – पाच विजयी
*आघाडी
– शिवसेना – दोन आघाडीवर
-राष्ट्रवादी – तीन आघाडीवर
– राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख विजयी.
– काँग्रेस – चार आघाडीवर
– नागपूर जिल्हा परिषद – एकूण जागा 58