पुणे : बहुजननामा ऑनलाइन – दिल्लीत जेएनयूत झालेल्या हिंसेचे पडसाद देशभरात उमटत असून, पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेठेत असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यलयात लावलेल्या फलकला काळे फासले. दुपारी हा प्रकार घडल्यानंतर तुफान गोंधळ उडाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत अ.भा.वि.प च्या प्रतीक गुधाटे (वय 22) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल मोरे व त्याच्यासोबत असणाऱ्या 7 ते 8 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यपीठात दोन दिवसांपूर्वी अचानक तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी सळई आणि लाकडे घेऊन आलेल्या टोळक्याने राडा घालत येथील विध्यार्थ्याना बेदम मारहाण करण्यात आली. यात अनेकजण गंभीर जखमी झाले. यानंतर देशभरात याचा निषेध व्यक्त केला जात आहे. मोर्चे व निदर्शने काढण्यात येत आहेत.
दरम्यान त्यातच मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे 8 ते 9 कार्यकर्ते येथे आले. त्यांनी कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या फलकास काळे फासले. तसेच घोषणाबाजी करत तेथून निघून गेले. यानंतर याची माहिती काही वेळातच वाऱ्या सारखी पसरली. अ.भा.वि.प चे कार्यकर्ते याठिकाणी जमा झाले आणि अचानक एकच गोंधळ उडाला. पोलिसांना ही।माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलिसांनी गोंधळ वाढू नये यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यलयात बंदोबस्त तैनात करण्यात आला.