देहरादून : वृत्तसांस्था – देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असून अत्यावश्यक सेवा आणि कर्तव्य बजावणार्या पोलिसांनंतर आता प्रशासकीय यंत्रणा आणि मंत्र्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. भाजपचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतपाल महाराज यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.
सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. रविवारी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या निवासस्थानी काम करणार्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
आतापर्यंत येथे रुग्णांची संख्या 749 वर पोहोचली आहे. रविवारी, आणखी 33 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.