श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील अवंतिपोराच्या त्राल येथील सैमोह भागात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्या सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृत्यु झाला.
One terrorist killed in an encounter that has begun at Saimoh area of Tral, Awantipora. Police and security forces are carrying out the operation. More details awaited: Jammu & Kashmir Police (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/gjhkA7SeHi
— ANI (@ANI) June 2, 2020
त्राल येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस आणि सुरक्षा दल यांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यावेळी दहशतवाद्यांबरोबर चकमक उडाली. यामध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खातमा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.