लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमधील चिनहटच्या विकल्पखंडमधील सूडाचे निदेशक उमेश प्रताप सिंह यांच्या पत्नीच्या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता असं त्यांचं नाव आहे. दरम्यान उमेश प्रताप सिंह यांचा मेहुणा राजीव सिंह यांनी आपल्या बहिणीला मारहाण केल्याचा आणि आरोपीचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. राजीव यांनी आयएएस अधिकारी उमेश प्रताप सिंह यांच्यावर आरोप करत म्हटले की, “गोळी लागल्यानंतर दोन तासांनंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.”
‘सर्व बाजूंनी तपास केला जाईल’ : पोलीस
पोलीसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, त्यांना घटनेची माहिती दोन तासांनी मिळाली आहे. पोस्टमॉर्टम आणि फॉरेंसिक रिपोर्ट आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल. आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा आशुतोषचं म्हणणं आहे की, गोळी झाडल्याचा आवाज ऐकताच तो पहिल्या मजल्यावरील आईच्या खोलीकडे धावत गेला. तेथे त्यानी वडिलांना दरवाजा तोडताना पाहिले. यानंतर त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन आईला ट्रामा सेंटरमध्ये नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सुरु होते मानसिक उपचार
आयएएस अधिकारी उमेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या नेहमीच उदास असायच्या.” पोलिसांना मानसिक उपचाराची औषधे, अधिकाऱ्याची लायसन्स पिस्तूल आणि खोकं सापडलं आहे. पोलिसांना कोणतीही सुसाईड सापडली नाही.
पतीला अनिता म्हणाल्या सॉरी फॉर ऑल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी अनिता यांनी पती उमेश यांना व्हॉट्स अॅपवर मेसेज केला होता की, “सॉरी फॉर ऑल.” हा मेसेज त्यांनी का पाठवला होता याचा तपास केला जात आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी