अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असून त्यांनी आज मोटेरा स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषांची सुरुवात ‘नमस्ते’ असे म्हणत केली. ट्रम्प यांनी मोदींबद्दल त्यांच्यावर प्रत्येकजण प्रेम करतो, असे म्हटले. ‘मोदी यांना केवळ गुजरातच नाही तर पूर्ण देश पसंत करतो आणि ते भारताचा मान आहेत,’ असेही ते म्हणाले. त्यांच्या योजनांचा उपयोग भारतात प्रत्येक मिनिटाला १२ लोकं गरिबीच्या रेषेवरून जात आहेत, असेही म्हणत त्यांनी मोदींचे कौतुक केले.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतात चालवल्या जाणाऱ्या योजनांचेही कौतुक केले आहे. ‘अमेरिका भारतावर प्रेम करते. भारताचा आदर करते आणि नेहमी भारताचा इमानदार आणि निष्ठावान मित्र राहील,’ असे ट्रम्प म्हणाले.
त्यांनी मोटेरा स्टेडियम अतिशय सुंदर असल्याचे म्हटले. ‘मी ८ हजार किमी पर्यंतचा प्रवास करून इथे हे सांगायला आलो आहे की, अमेरिका भारतावर खूप प्रेम करते. भारत हा एक सहनशील देश आहे आणि पीएम मोदी चॅम्पियन आहे,’ असे ट्रम्प म्हणाले.
पुढे ट्रम्प म्हणाले की, ‘पीएम मोदी हे राजकारणात येण्या अगोदर चहा विकत होते. प्रत्येकाला ते आवडतात. पण हे काम खूप अवघड आहे आणि ते खूप कठोर आहेत. आज पीएम मोदी हिंदुस्थानच्या सर्वात मुख्य नेते आहेत. मागच्या वर्षी ६० कोटीपेक्षा जास्त लोकांनी पीएम मोदींना वोट केले आणि सगळ्यात मोठी विजय नोंदवला.’ ‘मोदींच्या नेतृत्वात लोकं गरिबीतून बाहेर येत असून जास्तीत जास्त घरात लोकं गॅसवर जेवण बनवत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत खूप गतीने पुढे जात आहे,’ असेही ट्रम्प म्हणाले.