नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये एकीकडे कोरोना विषाणूचा धोका आहे तर दुसरीकडे अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशा परिस्थितीत घाबरलेल्या चीनला वाटत आहे की, आर्थिक उपक्रम पुन्हा सुरू व्हावेत. ज्यामुळे त्याचे नुकसान कमी होईल. पण असे केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार अधिक वेगाने वाढला आहे. विशेष म्हणजे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूची कम्युनिस्ट चीनच्या इतिहासातील सर्वात मोठी आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.
चीनच्या शीर्ष नेतृत्त्वाकडून होणाऱ्या दबावामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता आणि दबाव निर्माण निर्माण होऊ शकतो. उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी आणि आर्थिक संकंटांचे निराकरण होईल, असे चिनी राष्ट्रपती आणि इतर दुसऱ्या नेत्यांना वाटते. चीनचा उच्च आर्थिक विकासाच्या दराचा लोभ कायम असून त्यांना भीती आहे की कोरोना विषाणूमुळे ते आर्थिकदृष्ट्या मागे पडतील.
अनेक ठिकाणी कारखाने उघडतात याच अनुषंगाने वुहानपासून ६०० किलोमीटर दूर झेजियांग प्रांतात बर्याच ठिकाणी उत्पादन उपक्रम पुन्हा सुरू केले गेले. एका वृत्तसंस्थेनुसार आपल्याकडे सध्या सर्वात मोठी समस्या कामगारांची असून कोरोनामुळे लोक भयभीत झाले आहेत. त्यांना घराबाहेर पडायचे नाही. कंपनीत ४०० हून अधिक कामगार काम करायचे. पण त्यांना सध्या अडचण येत असून अशा परिस्थितीत आम्ही पूर्वीसारखे उत्पादन करू शकणार नाही, असे या कापड कारखान्याच्या मालकाने सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच या भागात आणखी बरेच कारखाने सुरू केले जाणार आहेत.
कारखाने पुन्हा सुरू झाल्यास कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो, अशी भीती लोकांना वाटत आहे. आतापर्यंत चीनमधील वुहान प्रांताला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पण जर आर्थिक घडामोडी सुरू झाल्या आणि लोक दुसर्या ठिकाणी जाऊ लागले तर कोरोना विषाणूशी लढाई अशक्य होईल.
चीनमध्ये कोरोना विषाणूबद्दल बर्याच प्रकारच्या बातम्या असताना त्यांच्यात काही कॉन्स्पिरसी थेअरी आहे. यातील एक सिद्धांत असा आहे की चीनमध्ये जैविक शस्त्रे विकसित केली जात होती आणि कोरोना विषाणू त्याचाच दुष्परिणाम आहे.
चीनवर कोरोना व्हायरस लपवण्याचा आरोपही असून कोरोनाच्या संकटाची जाणीव झाल्याने चीनने कुरकुर केल्याचे बर्याच अहवालात उघड झाले आहे. इतकेच नाही तर एखाद्या डॉक्टरांनी सरकारला याबाबत इशारा दिला, तर त्याचा आवाज दाबला गेला. नंतर त्या डॉक्टरचेही कोरोनामुळे निधन झाले.