बहुजननामा ऑनलाइन – अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (us president)निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(us president) यांना जबरदस्त धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबत त्यांनी ट्विटरव्दारे माहिती दिली आहे. यापुर्वी ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःला क्वारंटाईन देखील करून घेतलं होतं. सध्या ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया या देखील क्वारंटाठृन झाल्या आहेत.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1311892190680014849
3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. गुरूवारी रात्री ट्रम्प आणि पत्नी मेलेनिया हे क्वारंटाईन झाले होते कारण ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली होती. खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी त्याबाबतच ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट केलं होतं.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1311859538279239686
अत्यंत प्रमाणिक आणि मेहनतीने काम करणार्या होप हिक्सला कोरोनाची बाधा होणे हे धक्कादायक असल्याचं ते म्हणाले होते. आपण आणि पत्नी मेलेनिया यांनी कोरोनाची चाचणी केली असून त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा असल्याचं देखील ट्रम्प यांनी त्यावेळी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटलं होतं. खासगी सल्लागार होप हिक्स या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नियमितपणे प्रवास करतात. सध्या होप हिक्स आणि इतर काही अधिकारी क्लीवलँड, ओहियो येथे निवडणुकीच्या कामासाठी गेले होते आणि त्यानंतर होप हिक्स यांना कोरोनाची बाधा झाली असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे. सध्या तरी डोनाल्ड ट्रम्प हे क्वारंटाईन झाले आहेत.