बहुजननामा ऑनलाईन टीम – इंडियन रेल्वे अँड टुरिझम कोर्पोरेशनमध्ये ८५ जागांवर नियुक्त्या होणार आहेत. IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंग, टुरिझम आणि ऑनलाईन तिकीट बुकिंगचे काम पाहते यासाठी पर्यवेक्षक पदाची ही भरती असणार आहे. ज्या लोकांचे शिक्षण बीएस्सी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनीस्ट्रेशन मधून झाले आहे ते व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
एकूण जागा – ८५
पद – पर्यवेक्षक (हॉस्पिटॅलिटी )
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (बीएस्सी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनीस्ट्रेशन) आणि १ वर्षाचा अनुभव
वयाची अट – १ जुलै २०१९ रोजी ३० वय पूर्ण. SC/ST- ५ वर्षाची सूट, OBC- ३ वर्षाची सूट
नोकरीचे स्थळ – देशभरात कोठेही
वेबसाईट – https://majhinaukri.in/irctc-recruitment/