नवी दिल्ली – वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेचा अपघाताची घटना ही अपघात नसून तो घातपातच होता. अशी माहिती आयबीने दिली आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश पोलीस हे आमदाराच्या दबावाखाली होते. असेही आयबीने म्हटले आहे.
पिडीतेच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून तो घातपातच आहे असे आयबीच्या सुत्रांनी सांगितले आहे. त्या दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांचे जे दहा गार्ड तिच्या सोबत असायचे ते नव्हते. त्यासोबतच धडक देणाऱ्या ट्रकची नंबर प्लेट काळं ग्रीस लावून लपविण्यात आली होती. तसेच उत्तर प्रदेश पोलीस हे आरोपी आमदाराच्या दबावाखाली आहेत. असं आयबीच्या सुत्रांनी सांगितले आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात तिची मावशी आणि काकू या दोघींचा मृत्यू झाला तर पिडीत महिला ही सध्या गंभीर स्थिती आहे. पिडितेच्या आईने १२ जूलै रोजी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश रंजन गोगोई यांनी दखल घेतली असून याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकऱणाशी निगडीत असलेल्या सर्व केसेस आता उत्तर प्रदेश बाहेर ट्रान्सफर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.