अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभेच्या निवडणूकामध्ये प्रत्येक उमेदवार आपआपले नशीब आजमावत असताना शिर्डी मतदारसंघातून युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या आणखी १४ इच्छुक उमेदवारांसह २० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २ एप्रिल पासून सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ एप्रिलला शिर्डी मतदारसंघातून अशोक गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर भरला आहे.
भारत संजय तुपे (रा. गोंधवणी, श्रीरामपूर), सुनील शिवाजी उदमले (वेळू रोड, श्रीगोंदे), अशोक रामचंद्र गायकवाड (चांदा, श्रीगोंदे), संपत खंडू समिंदर (रा. साईनगर, श्रीगोंदे), सचिन सदाशिव गवांडे (रा. कळस, अकोले), भगवान विष्णू दोडके (रा. निपाणी वडगांव, श्रीरामपूर), राजेंद्र रत्नाकर वाघमारे, (रा. नेवासाफाटा, नेवासे) यांनी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, अविनाश सर्जेराव तिपायले (मुर्शतपूर, कोपरगाव) यांनी प्रमोद बबनराव सातपुते यांच्यासाठी, विजय रामदास कोळगे (रा. सावेडी) शिर्डी या मतदारसंघामधून सर्व उमेदवारांच्या उमेदवारिने या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे पाहायला मिळणार आहे.